Nandurbar News Today – एका घरातून दोन तोळे सोने, पन्नास हजार कॅश व तीन तोळे चांदीची चोरी.तर दुसऱ्या घरातून दीड लाख कॅश ची चोरी. प्रकाशा येथील नवीन वसाहत मध्ये राहणारे उद्धव रघुनाथ पाटील व समाधान पवार यांच्या दोघांच्या घरी शनिवारी मध्यरात्री भुरट्या चोरांनी चोरी केली. हे दोन्ही परिवारातील लोक गावाला गेले होते. घराला कुलूप होते. त्याची संधी साधत चोरट्यांनी हा साफ केला. विशेष हे दोन्ही घरे पोलीस स्टेशनचा मागील बाजूस असणाऱ्या कॉलनीतील आहे.
प्रकाशा येथील पोलीस स्टेशनचा मागील बाजूस नवीन वसाहत मधील शिवशक्ती नगर मध्ये शनिवारी रात्री धाडसी चोरी करण्यात आली आहे. त्यात शिवशक्ती नगर मध्ये राहणारे उद्धव रघुनाथ पाटील यांचा घरातील सर्वच लोक गावाला गेले होते. आज रविवार रोजी दुपारी बारा वाजता घरी आल्यानंतर कुलूप उघडून पाहिले असता. लॉक तोडलेले दिसून आले. त्याच वेळेला त्यांनी पोलिसांना कॉल करून घरी बोलावले तेव्हा घरात अस्ताव्यस्त सामान पडला होता.तर त्यात त्यांचा घरातील दोन तोळे सोने, पन्नास हजार कॅश,तर आठ तोळे चांदीची चोरी झाल्याची घरमालकांनी सांगितले.तसेच समाधान पवार यांचे घर शिवशक्ती नगर मध्ये आहे.
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
त्यांची पत्नी, मुलं, गावाला गेली होती. म्हणून ते झोपण्यासाठी स्टॅन्ड परिसरात त्यांचे स्वतःचे ट्रॅक्टर गॅरेज आहे. त्या ठिकाणी झोपले होते. सकाळी घरी आले असता त्यांचा घराचे लॉक तुटलेले दिसून आले. याप्रसंगी सकाळी त्यांनी पोलिसांना घटना कळविले असता प्रकाशा पोलीस दूर क्षेत्राचे पोलीस आलेत घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले.त्यांच्या तिजोरीतून एक लाख चाळीस हजार कॅश चोरी झाल्याचे पोलिसांना सांगितले.
सीसीटीव्ही संशयित चोर दिसून येत आहे :- प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचा मागे एका घराच्या वरती सीसीटीव्ही कॅमेरा लावलेल्या आहेत. ते पाहिले असता शनिवारी मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांनी एका मोटर सायकलवर दोन जण संशयितरित्या दिसून येत आहे. पोलिसांनी जर या गोष्टीचा खंगाळून तपास केला तर चोरीचा शोध लागू शकतो.(Nandurbar News Today)
नवीन वसाहत मध्ये मोठ्या प्रमाणावर चोरी :-
नवीन वसाहत मध्ये ही मोठी चोरी झाली आहे. या अगोदरही या नवीन वसाहत मधून,चोरी वव मोटरसायकली चोरीला गेलेले आहे.आठ दिवसापूर्वीच महेंद्र पाटील यांच्या घरासमोरील मोटरसायकल भुरट्या चोरांनी चोरून नेली आहे.तसेच संगीता पाटील यांच्या कडेही सहा महिन्यापूर्वी चोरी झाली होती. तेही गावाला गेले असता. त्यांच्या घराचा मागील दरवाजा तोडून भुरट्या चोरांनी प्रवेश करत. कॅश व सोन्याची चोरी केली होती. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. मात्र अद्याप्याच्या शोध लागलेला नाही.
प्रकाशा येथे पोलिस संख्या वाढवण्याची मागणी :-
प्रकाशा हे गाव तालुक्यात मोठे गाव आहे. सुमारे पंधरा ते वीस हजार लोकसंख्या आहे. या पोलीस दूरक्षेत्राला सुमारे 24 गाव जोडले आहेत. मात्र पोलीस कर्मचारी तीनच आहेत.वेळोवेळी वेळोवेळी होणाऱ्या चोरी लक्षात घेता पोलीस कर्मचारी ची संख्या वाढवण्याचे मागणी होत आहे.तसेच रात्री ग्रस्त घालणारे पोलिसांची संख्या वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (Nandurbar News Today )
प्रतिनिधी – नरेंद्र गुरव प्रकाशा