शहादा /नंदुरबार -११/७/२३
दोन जुलै 2023 रविवार रोजी संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात एकच राजकीय खळबळ उडाली आणि मोठा राजकीय भूकंप झाला.. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातली नेतृत्व आणि फिरवलेली भाकरी आणि अजित पवारांच्या मनात असलेली खदखद अखेर बाहेर आली.. आणि राज्याला मिळाले दोन उपमुख्यमंत्री.. एक म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून युती सरकारमध्ये सामील झालेले अजित पवार.. अजित पवारांनी दोन जुलै रोजी गोपनीयतेची उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र त्याचं सारं पडसाद महाराष्ट्रात उमटल्याचं पाहिलं मिळालं.. राष्ट्रवादीत उभी फूट पडली आणि पवार विरुद्ध पवार असे दोन गट उभे ठाकले..
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
नंदुरबार जिल्ह्यातही त्याचं लोण पोहोचलं थेट शहादा शहरात .. नंदुरबार जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे यांनी मुंबईतल्या बैठकी प्रसंगी अजित पवार गटाला समर्थन दिल.. वरच्या स्तरावर वरिष्ठांच्या शब्दाला जागण्याचं काम जिल्हाध्यक्षांनी केलं खरं. पण पक्षाच्या वाढीसाठी झटतो तो कार्यकर्ता तो मात्र संभ्रमात पडला.. शरद पवारांच्या पाठीशी उभे राहायचं की युवा नेतृत्व अर्थात अजितदादांच्या मागे खंबीरपणे उभे राहून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करायचे या संभ्रमात शहादा शहरातील कार्यकर्ते पडले.. त्यांच्यासमोर प्रश्न उभा होता कोणता झेंडा घेऊ हाती? या साऱ्या प्रश्नांची उकल काढण्यासाठी एमडीटीव्ही न्यूजचे शहादा प्रतिनिधी संजय मोहिते यांनी राष्ट्रवादी कार्यकारणीशी सविस्तर चर्चा केली ..
शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष अजित पवारांसोबत असल्याचं यातून स्पष्ट झालं.. दिलखुलासपणे संजय मोहिते यांनी विविध प्रश्नातून शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांना बोलकं केलं.. राष्ट्रवादीचा शहादा गट अजित पवार यांच्या सोबतच असल्याचे स्पष्ट करून शहादा शहरातही आता दोन गट निर्माण झाले का असा प्रश्न यातून उपस्थित झाला.. मात्र शहर आणि तालुका कार्यकारिणी अजितदादांच्या पाठीशी उभे आहेत हे मात्र चित्र स्पष्ट झालं.. पण शहर ,तालुका गट ,अजित पवारांच्या गटाच्यासोबत असल्याने नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळण्यात मदत होईल हे मात्र मान्य करावे लागेल.. ऐकूया नेमकं शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांनी अजित दादा सोबत जाण्याचा मार्ग का स्वीकारला..
आगामी काळात नंदुरबार जिल्ह्यातल्या विविध तालुक्यात असे दोन गट आपल्याला पुढील राजकारणात पाहायला मिळतील हे म्हणणे वावगे ठरू नये.. आणि हे सांगण्याची कोण्या भविष्यवेत्याची देखील गरज नसावी तेवढेच खरे.. राजकारणात कधी कोणता केव्हा भूकंप होईल हे आपण सांगू शकत नाही.. सकाळचा शपथविधी आता लोकांनी अनुभवला दुपारचा शपथविधी.. यामुळे आगामी काळात विधानसभा लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप सोबत जोडला गेलेल्या राष्ट्रवादीचा अजित पवार गट महायुतीला अधिक बळकट करण्यात काय योगदान देतो हे पाहणे महत्वाचे ठरेल..
जगन ठाकरे सह संजय मोहिते ,शहादा प्रतिनिधी ,एम डी टीव्ही न्यूज नंदुरबार