भाजपाकडून ईडीचा गैरवापर ; जिल्हाध्यक्ष अभिजित मोरेंची टीका
नंदुरबार :- ईडी.. भाजपाचा घरगडी, वॉशिंग पावडर ईडी… वॉशिंग पावडर ईडी, भाजपाचा हवालदार काय करतो… ईडीच्या नोटीसा वाटत फिरतो, पन्नास खोके… ईडी पण ओके, भाजपा हमसे डरती है… ईडी को आगे करती है,.. अशा विविध घोषणा देत नंदुरबारच्या राष्ट्रवादीतर्फे भाजपा सरकारचा निषेध करीत आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे शहरातील नेहरु पुतळा परिसरात शहर पोलीस स्टेशनसमोर भाजपच्या हुकूमशाही पद्धती विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव राऊ मोरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेध आंदोलन करण्यात आले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यावेळी डॉ.अभिजीत मोरे म्हणाले की, ईडीचा गैरवापर करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्रास देण्याचा, त्यांची बदनामी करण्याचा जो प्रकार भाजप सरकारने चालवला आहे, त्या विरोधात महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात आणि तालुक्यात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे भाजपच्या हुकूमशाही पद्धती विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. याआधी असेच प्रकार अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यासोबत देखील भाजपने केला आहे. कथित आरोपावरून या नेत्यांना तुरुंगात टाकण्याचे कटकारस्थान हे भाजपनेच केले आहेत. जे लोक भाजपामध्ये जातात त्यांच्याकडे ईडी दुर्लक्ष करते, अशी टीका मोरे यांनी यावेळी भाजपावर केली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जि.प.सदस्य मोहन शेवाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, नंदुरबार शहर कार्याध्यक्ष कमलेश चौधरी, शहादा पं.स.सदस्य राजेंद्र बाविस्कर, विद्यार्थी सेल जिल्हाध्यक्ष बबलू कदमबांडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नंदुबार शहराध्यक्ष लल्ला मराठे, कालू पहेलवान, जितु ठाकरे, राजु शिंदे, जयंत मोरे, लाला बागवान, राजा ठाकरे, अदनान मेमन, राहुल जगदेव, बापू महाले, रविंद्र जावरे, निलेश चौधरी, गोविंद शेवाळे, अनमोल पाडवी, अमीन खाटीक, पवन चव्हाण, समीर शेख, अमन पाडवी, मुकेश ठाकरे, जय ठाकरे आदी उपस्थित होते.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.