गार्गी फुले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश ; अजितदादा व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
मराठी चित्रपट सृष्टीतील अजरामर असलेले दिवंगत अभिनेते निळू फुले यांची कन्या गार्गी फुले या कला क्षेत्रात काम करतात. मात्र आता राजकीय क्षेत्रात देखील त्यांनी पदार्पण केले आहे. अभिनेत्री गार्गी फुले यांनी आज मंगळवारी (दि.३०) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते, विधानसभा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
मराठी चित्रपट सृष्टीतील अजरामर असलेले दिवंगत अभिनेते निळू फुले यांनी अनेक चित्रपटांमध्ये राजकीय नेत्याच्या भूमिका साकारल्या. प्रत्यक्षात मात्र निळू फुले राजकारणापासून लांब होते. मात्र राष्ट्र सेवा दलात काम केल्यामुळे त्यांची सामाजिक जाणिव अत्यंत प्रगल्भ होती. सामाजिक कार्यांत ते अग्रेसर होते. त्यांची कन्या गार्गी फुले या कला क्षेत्रात काम करतात, मात्र आता राजकीय क्षेत्रात देखील त्यांनी पदार्पण केले आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर अभिनेत्री गार्गी फुले म्हणाल्या, मला अनेक दिवसांपासून अजित पवार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे मला पक्षप्रवेशाबाबत विचारणा झाल्यानंतर ऱाष्ट्रवादी पक्षाचा जो विचार आहे, त्याच विचारांचे माझे बाबा निळू फुले देखील होते. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासोबत माझ्या वडिलांचे चांगले संबंध होते. राष्ट्रवादीत प्रवेश करुन आता मुख्य प्रवाहात काम करायचे आहे, असे गार्गी फुले म्हणाल्या.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
अभिनेत्री गार्गी फुले यांनी आज मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते विधानसभा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. काहीपर्षांपूर्वी अभिनेते अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. ते सध्या लोकसभा सदस्य आहेत. अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. काही काळापूर्वी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेते प्रभाकर मोरे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, गायक संजय लोंढे, गायिका वैशाली माडे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, मुंबई.