मोजरापाडा येथे एकावर घातक शस्त्राने मारहाण

0
289

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील त्रिशूलचा मोजरापाडा येथे दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरुन एकावर घातक शस्त्राने मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धडगाव तालुक्यातील त्रिशूलचा मोजरापाडा येथील गुला रनज्या पवार यांनी कोट्या तुमड्या पावरा यांना पाच वर्षापूर्वी दिलेले २ हजार ६०० रुपये परत मागितले. याचा राग आल्याने गुला पवार यांना कोट्या पावरा याने काठीने पाठीवर, पोटावर मारहाण केली.

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

बहादा तुमड्या पावरा याने कुऱ्हाडीच्या दांड्याने डोक्यावर मारले. दिनेश बहादा पावरा व शिवाजी बहादा पावरा यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच घातक शस्त्राने मारहाण करुन गंभीर दुखापती केले.

SPONSORED CONTENT

याबाबत गुला पवार यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कल् ३२६, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.स्वप्निल गोसावी करीत आहेत

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here