पंडीत मिश्रा यांची शहरातून निघणार शोभायात्रा
दुपारी १ वाजता शिव चर्चेला होणार सुरुवात
नंदुरबार :- शहरातील छत्रपती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या शुभारंभ अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शिवकथाकार पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शुभ हस्ते होणार आहे. यानिमित्त पंडीत मिश्रा यांचे नंदुरबारात सकाळी ११ आगमन होणार असून शहरातील प्रमुख मार्गावरून खुल्या वाहनातून त्यांची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्र्याना आमंत्रित करण्यात आले आहे. शिवचर्चा दुपारी १ वाजता सुरू होणार असून यासाठी जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती माजी आमदार तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.
नंदुरबार शहरात उभारण्यात येत असलेल्या छात्रपती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटचे उद्घाटन शिवकथकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या हस्ते दिनांक २२ एप्रिल रोजी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना संबोधित करताना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात माहिती दिली. श्री.रघुवंशी म्हणाले की, नंदुरबारच्या जनतेसाठी वरदान ठरेल अशा हॉस्पिटलची निर्मिती करण्यात येत आहे. राजकारणात केवळ मते मागण्यापेक्षा त्या जनतेची सेवा करण्यासाठी रघुवंशी परिवाराने मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल निर्मितीचा निर्णय घेतला आहे. १२५ बेडचे आधुनिक सोयी सुविधांनी युक्त, तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत आरोग्याच्या सुविधा देण्यात येणार आहेत. या हॉस्पिटलचे काम अंतिम टप्प्यात आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
छत्रपती मल्टिडपेशालिस्ट हिस्पिटलच्या उद्घाटनासाठी शिवकथाकार पंडित मिश्रा यांना निमंत्रित करण्यात आले आहे. नंदुरबारातील जनता तसेच भगिनींच्या इच्छेनुसार शिव चर्चेचे आयोजन केले आहे. यासाठी दिनांक २२ एप्रिल रोजी अक्षयतृतियेला पंडित मिश्रा यांचे सकाळी ११ वाजता हेलिकॉप्टरने नंदुरबारातील जी.टी. पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणावर आगमन होईल. त्यानंतर खुल्या वाहनातून रघुवंशी बुकडेपो, अंधारे चौक, आमदार कार्यालय, जुनी पालिकेला वळसा घेत नवीन पालिका, नेहरू पुतळा, गांधी पुतळा मार्गे चंद्रकांत रघुवंशी यांच्या निवासस्थानी शोभायात्रेचा समारोप होईल. याठिकाणी भोजन घेतल्यावर पंडित मिश्रा कार्यक्रमस्थळी येतील.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
पंडित मिश्रा यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हॉस्पिटलचे उद्घाटन होईल, त्यानंतर पंडित मिश्रा हे सभामंडपात येतील व शिवपूराण चर्चेला प्रारंभ होईल. यासाठी सुमारे १ लाख भाविक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातून तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी उड्डाणपूल नजीकच्या मिरची पथारीची जागा, कृउबा मार्केट, तसेच जाणता राजा परिसरात व्यवस्था राहणार आहे. या रस्त्यांवर ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी ठिकठिकाणी स्वयंसेवक राहणार आहेत. शहरासह जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा जि.प.चे माजी उपाध्यक्ष राम रघुवंशी, डॉ. तुषार रघुवंशी, डॉ.रोशन भंडारी, नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, कैलास पाटील आदी उपस्थित होते.
जीवन पाटील, एम.डी.टी.व्ही. न्युज, नंदुरबार