नंदुरबार : शहादा-शिरपूर रस्त्यावरील हिंगणी फाट्याजवळ दोन दुचाकींचा समोरासमोर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका दुचाकी चालकाविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहादा पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील खैरवे येथील रविंद्र चतुर मोरे व श्रीकांत युवराज पाटील हे त्यांच्या दुचाकीने (क्र.एमएच.१८ – एएम ८४८५ ) शहादा-शिरपूर रस्त्याने जात होते. यावेळी एका अज्ञात दुचाकी चालकाने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एमएच.४१ – एएन ७४९२) भरधाव वेगात चालवून हिंगणी फाट्याजवळ श्रीकांत पाटील यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराहे देखील वाचा:
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
या अपघातात रविंद्र मोरे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला तर श्रीकांत पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर धडक देणारा दुचाकीचालक दुचाकीसह घटनास्थळावरून पसार झाला. प्रशांत दिलीप भिल यांच्या फिर्यादीवरुन सारंगखेडा पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकी चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १३४, १८४, १८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भगवान कोळी करीत आहेत.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार

