तळोदा :- घरासाठी कौल घेण्यास जात असताना चांदसैली घाटाच्या उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप उलटून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले असून पिकअप गाडीचे पूर्णतः नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धडगाव तालुक्यातील वावी येथून घराची कौले घेण्यासाठी चांदसैली मार्गे वेलदा ता.निझर या ठिकाणी जात असताना काळाने झडप घातली. पिकअप वाहन घाट उतरत असताना एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि पिकअप तीनचार पलटी घेत रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना आज दि.23 मे रोजी घडली. या घटनेने वावी परिसर शोकसागरेत बुडाला.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराहे देखील वाचा:
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
या अपघातात पिकअप चालक तुकाराम दिवल्या ठाकरे (वय ३५ रा.वावी,ता.धडगाव ), विरसिंग रमेश पावरा (वय.३५,रा.बोधला, ता.धडगाव ), मुकेश कैला ठाकरे (वय २५ रा.वावी,ता. धडगाव ), अमरसिंग शंकर ठाकरे (वय ३० रा.वावी,ता.धडगाव ) यांचा मृत्यू झाला आहे. तर सुरुपसिंग साकऱ्या ठाकरे ( वय २० रा.वावी, ता.धडगाव ) व गणेश साकऱ्या ठाकरे ( वय.१५ रा.वावी, ता धडगाव ) हे गंभीर जखमी झाले आहेत. मयतांवर तळोदा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
नितीन गरुड. एन.डी.टी.व्ही. न्युज, तळोदा ग्रामीण.

