आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय
सततच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते आहे. यात हाती आलेला घास बेमोसमी पाऊस हिरावून नेत असल्याने बळीराजा समोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
असे असताना मात्र बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
आता सतत होणारा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित करण्यात येणार आहे. तसा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्याने बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे.आज बुधवारी मंत्रिमंडळ केबिनेट बैठक झाली. या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित करण्यात आला.
ग्राहकांना स्वस्त दरात वाळू, रेती उपलब्ध होण्यासाठी सुधारित रेती धोरणास मंजुरी देण्यात आली.
अतिविषेशोपचार विषयातील पदव्युत्तर, पदवी विद्यार्थी संख्येत वाढ करण्यात येऊन सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक संवर्गातील 14 पदे निश्चित करण्यात आले.
महावितरण कंपनीस कर्ज घेण्यास शासन हमी चा निर्णय या बैठकीत झाला.
यासह उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य, नगर विकास, महसूल, मदत व पुनर्वसन विभागासाठी महत्वपुर्ण निर्णय केबिनेट बैठकीत घेण्यात आले.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्यूरो नंदुरबार / मुंबई