नेर :- सुरत-नागपूर महामार्गवरील साक्री तालुक्यातील ईच्छापूर गावाजवळ स्टाईल फरशी घेऊन जाणारा ट्रालाचे टायर फुटल्याने ट्राला उलटून लाखोंचे नुकसान झाल्याची घटना काल रविवारी घडली. सुदैवाने अपघातात जीवितहानी झालेली नाही.
गुजरात राज्याकडून धुळेकडे जात असताना ट्राला ( क्रमांक. एमएच ४१ – एयू ३८५७ ) रविवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान स्टाईल फरशी घेऊन भरधाव वेगाने जात होता. यावेळी साक्री तालुक्यातील ईच्छापूर गावाजवळ ट्रालाचे टायर फुटले. यामुळे चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने ट्राला रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराहे देखील वाचा:
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
या अपघातात वाहनाचे व भरलेला मालाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यावेळी मदतीसाठी जवळील ग्रामस्थानी व महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत चालक व सहचालक यांना वाहनातून सुरक्षित बाहेर काढले. अपघातात मोठी वित्त हानी झाली असून मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घटनेचा महामार्ग पोलिसांनी पंचनामा केला आहे.
दिलीप साळुंखे. एम.डी.टी.व्ही. न्युज धुळे

