शिरपूर :- शिरपूर तालुक्यातील तापमानाच्या पाराने ४० शी पार केल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
नागरिकांनी काळजी घेत वृद्ध व बालकांची काळजी घेण्याची, तसेच कामानिमित्त बाहेर जाताना उन्हापासून बचावासाठी आवश्यक साधने वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
राज्यभरात तापमानाचा पारा वाढत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील रस्ते दुपारी १२ नंतर निर्मनुष्य दिसू लागली आहेत.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
दुपारी १२ वाजेपासूनच वर्दळीचे रस्ते ओस पडत आहे.
एप्रिल महिन्यात तापमानाने उच्चांक गाठल्याने शिरपूरसह तालुक्यातील नागरिकांना चटके बसत आहेत. शहरासह ग्रामीण भागात शीतपेयांना मागणी वाढली आहे. सकाळपासूनच उन्हाची दाहकता जाणवत असून सायंकाळी उशिरापर्यंत झळा बसू लागल्या आहेत.
दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत वर्दळ कमी असून अघोषित संचारबंदीसारखी स्थिती दिसून येते.
उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी टोप्या, उपरणे, बागायती रुमाल, गॉगल्सचा वापर वाढला आहे.
उन्हाची तिव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे दुपारी त्यात अधिक भर पडत आहे. परिणामी लोक शक्यतोवर घराबाहेर दुपारी निघत नसल्याने रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होतांना दिसत आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
राज जाधव. एम.डी.टी.व्ही. न्युज शिरपूर