Shirpur News : दोन वर्षांपासून फरार असलेले मोटार सायकल चोरीचे आरोपी जेरबंद..!

0
131
shirpur-news-accused-of-motorcycle-theft-is-in-jail

Shirpur News – शिरपूर शहर पो.स्टे. डी.बी. पथकाची कामगीरी.दोन वर्षापासुन मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन आरोपीतांना शिताफीने केले जेरबंद.

शिरपूर शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांना गुप्त बातमी मिळाली होती की, शिरपूर शहर पो.स्टे. गुरनं. ४२८/२०२२ भा. द. कलम ३७९, ३४ प्रमाणे दाखल मोटार सायकल चोरीच्या गुनद्यातील सुमारे ०२ वर्षापासुन फरार असलेले आरोपी.( Shirpur News )
१) नाविद शेख ऐजाज वय २४ रा. मनियार मोहल्ला, अडावद ता. चोपडा जि. जळगाव.
२) दिपक ऊर्फ दिनेश संजय शेटे वय २४ रा.कृषी मार्केट समोर, अडावद ता. चोपडा जि. जळगाव. हे अडावद ता. चोपड़ा जि. जळगाव येथे गावात आलेले असल्याबबावत मिळालेल्या बातमीवरून शिरपूर शहर पो.स्टे. चे शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांना दि.२१/०२/२०२४ रोजी अडावद ता. चोपडा जि. जळगाव गावात पाठवून सदर आरोपीतांचा शोध घेत त्यांना शिताफीने ताब्यात घेवून जेरबंद करून उल्लेखनीय कामगीरी केलेली आहे.

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर सचिन हिरे. यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, डी. बी. पथकाचे पोहेकॉ/ललीत पाटील, पोना/रविंद्र आखडमल, पोकॉ/ आरीफ तडवी, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, विनोद आखडमल, योगेश दाभाडे, मनोज महाजन, गोविंद कोळी, भटु साळुंके, सचिन वाघ होमगार्ड चेतन भावसार, शरद पारधी, राम भिल व गोपाल अहिरे अशांनी मिळून केली आहे.

एम डी टीव्ही न्युज साठी राज जाधव शिरपूर तालुका प्रतिनिधी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here