व्हिडिओ व्हायरल – जडेजाच्या पाया पडली पत्नी रिवाबा ..

मुंबई -३१/५/२३

Rivaba Jadeja viral video : सामना संपल्यानंतर जडेजा आणि धोनीचा एक व्हिडिओ सर्वत्र जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये धोनीने जडेजाला उचलून घेतलेल आहे. अशातच सोशल मीडियावर आणख एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जडेजाची पत्नी त्याच्या पाया पडत आहे.

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये झालेल्या फायनलमध्ये सीएसके संघाने बाजी मारली.
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात सुपरस्टार खेळाडू रवींद्र जडेजा याने चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला.
सामना संपल्यानंतर जडेजा आणि धोनीचा एक व्हिडिओ सर्वत्र जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
त्यामध्ये धोनीने जडेजाला उचलून घेतलेल आहे. अशातच सोशल मीडियावर आणख एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
ज्यामध्ये जडेजाची पत्नी त्याच्या पाया पडत आहे.

SPONSORED CONTENT

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
ऑल राऊंडर रविंद्र जडेजा शेवटच्या क्षणापर्यंत हार मानत नाही हे अनेकदा आपण पाहिलं आहे.
काल झालेल्या सामन्यामध्ये ते प्रत्यक्षपणे दिसूनही आलं. श्वास रोखून ठेवायला लावलेल्या सामन्यात जडेजाने कडक खेळी करत संघाला पाचव्यांदा चॅम्पिअन बनवलं. फायनल संपल्यानंतर जडेजाचे जोरदार कौतुक होत आहे. त्याचे व्हिडिओ आणि फोटोही खूप व्हायरल होत आहेत.
आता जडेजाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो पत्नी रिवाबा जडेजासोबत दिसत आहे.
विजेतेपदाचा सामना संपल्यानंतर रिवाबा जड्डूला भेटण्यासाठी मैदानात आली.
त्यावेळी जडेजाने मिठी करण्यासाठी हात पुढे केले पण रिवाबाने आधी त्याच्या पायाला स्पर्श केला.
यानंतर रिवाबा आणि जडेजाने मिठी मारली. सोशल मीडियावर अनेकांनी रिवाबाच्या या कृतीचं कौतुक केलं आहे.
ही भारतीय संस्कृती असल्याचं अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, रिवाबा जडेजा भाजप पक्षाची आमदार आहे मात्र भर मैदानात आपण आमदार आहोत असा कसलाही गर्व न करता तिने जडेजाच्या पायाला स्पर्श केल्याने तिचं सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमी कौतुक करत आहेत.

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो मुंबई

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here