गंगापूर येथील घटना : दोन जणांवर गुन्हा दाखल
नंदुरबार : दारू पिण्यास पैसे न दिल्याचा राग येऊन एकास मारहाण करणाऱ्या दोन जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर (ता. अक्कलकुवा ) येथील कालूसिंग आमश्या पाडवी हे गावातील हनुमान मंदिराच्या चौथऱ्यावर बसले असता त्याठिकाणी सुनील नरपती पाडवी व सागर बीज्या वसावे हे आले व त्यांनी कालूसिंग पाडवी यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैश्यांची मागणी केली.
कालूसिंग यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने सागर वसावे याने कालूसिंग पाडवी यांना पकडून ठेवले व सुनील पाडवी यांनी मंदिराच्यामागे पडलेल्या लाकडी डेंगाऱ्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत कालूसिंग पाडवी हे जखमी झाले.
कालूसिंग पाडवी यांच्या फिर्यादीवरून सुनील नरपती पाडवी व सागर बीज्या वसावे या दोघांविरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक देविदास वडघुले करीत आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार