नंदुरबार : ४/६/२३
वादळी पावसाने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा अक्कलकुवा तालुक्यात वादळी पावसाने अनेकांची घरे आणि छपरे उडून पडली
अनेक कुटुंबीयांचं नुकसान झालं
त्यात गोरगरिबांचा छत्रच हरपल्याने गरिबांच्या कुटुंबीयांवर संकटाचा डोंगर कोसळला
अचानकपणे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे बाजारात शेतात गेलेल्या नागरिकांची चांगली त्रे धा तिरपीट उडाली
वाऱ्याचा वेग इतका जास्त होता की अनेक घरांचे पत्रे उडाले
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
गुजरात राज्यामध्ये अचानक तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रभावामुळे सातपुड्याच्या पायथ्यालगत वादळी वारे आणि हलका पाऊस झाला
पुढील काही दिवसात अधिक वेगाने पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे
सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या या तळोदा तालुक्याच्या पट्ट्यात जोरदार पावसाने आगमन केलं
अनेक नागरिक वाचले असून जीवितहानी नाही मात्र झाडे रस्त्यावर पोचल्याने मोटारसायकली वाहनांचं नुकसान झालं
नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली
वरून राजाचं पुन्हा एकदा पुनरागमन झालं वाल्हेरी गावात घराची पडझड झाल्याचं वृत्त आहे
नितीन गरुड ,तळोदा ग्रामीण प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज