नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील विविध कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न..

0
231

नंदुरबार: 2/6/23

दिनांक 31 मे रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 05 पोलीस अधिकारी व 11 पोलीस अमंलदार व 01 कार्यालयीन कर्मचारी हे त्यांच्या वयाच्या 58 वर्षे झाल्यामुळे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.
पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातुन सेवानिवृत्त झालेले सर्व पोलीस अधिकारी व अमंलदार यांना सेवानिवृत्ती नंतर ज्या काही अडीअडचणी असतील त्या समक्ष भेटून मांडाव्यात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अमंलदारांच्या अडचणी निश्चीतच सोडविल्या जातील.

तसेच सेवानिवृत्त झालेले सर्व पोलीस अधिकारी व अमंलदार यांना सेवानिवृत्ती नंतर मिळणारे सर्व प्रकारचे लाभ लवकरात लवकर त्यांना देण्यात येतील असे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातून दिनांक 31 मे रोजी 02 पोलीस उप अधीक्षक, 01 राखीव पोलीस निरीक्षक, 02 पोलीस उप निरीक्षक, 09 सहा.पोलीस उप निरीक्षक, 02 पोलीस हवालदार व 01 मंत्रालयीन कर्मचारी असे एकुण 05 पोलीस अधिकारी, 11 पोलीस अमंलदार, 01 मंत्रालयीन कर्मचारी हे आपली पोलीस दलातील सेवा यशस्वीरीत्या पुर्ण करुन सेवानिवृत्त झालेले आहेत.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

दिनांक 31 मे रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरून सेवानिवृत्त होणाऱ्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर येथे एका छोटेखानी पण दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.

सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ तसेच सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांना सपत्नीक आहेर याप्रसंगी भेट देण्यात आला.
पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सेवानिवृत्तीच्या दिवशी मिळालेल्या उपहाराने व मान सन्मानाने उपस्थित अधिकारी व अमंलदार भारावून गेले होते.

सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अमंलदारांनी मनोगत व्यक्त करतांना पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व अमंलदार यांच्यासाठी घडवून आणलेल्या सुंदर कार्यक्रमाबद्दल आपल्या मनोगतात आभार व्यक्त केले.

सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार खालील प्रमाणे.
संभाजी सावंत
उप विभागीय पोलीस अधिकारी, अ.कुवा
श्रीकांत घुमरे
उप विभागीय पोलीस अधिकारी,शहादा.
देवनाथ राजपुत
राखीव पोलीस निरीक्षक, पो.मु. नंदुरबार.
राजेंद्र जगताप
पोलीस उप-निरीक्षक,निं.कक्ष, नंदुरबार.
अमृत पाटील,
पोलीस उप निरीक्षक, SDPO कार्यालय शहादा.
राजु काशिनाथ मोरे
सहा.पोलीस उपनिरीक्षक.
मगन रामसिंग गावीत
सहा.पोलीस उपनिरीक्षक.
रुदाम ओंकार न्हावडे
सहा.पोलीस उपनिरीक्षक.
रघुनाथ ओंकार मराठे
सहा.पोलीस उपनिरीक्षक.
चुनिलाल दौलत सावळे
सहा.पोलीस उपनिरीक्षक.
उत्तम धुडकु महाजन
सहा.पोलीस उपनिरीक्षक.
पांडुरंग ब्रिजलाल नाईक
सहा.पोलीस उपनिरीक्षक.
चंद्रकांत रामदास सोनार
सहा.पोलीस उपनिरीक्षक.
पितांबर रतन पाडवी
सहा.पोलीस उपनिरीक्षक.
सत्तार गणपत भिल
पोलीस हवालदार.
सुनिल अर्जुन अहिरे
पोलीस हवालदार.
वंदना सयाजीराव सैंदाणे
मंत्रालयीन कर्मचारी, पो.अ.कार्यालय, नंदुरबार

प्रविण चव्हाण,प्रतिनिधी, एम डी टी व्ही न्यूज ,नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here