मुंबई :१६/२/२३
शॉर्ट हेडलाईन
1 आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ लोकल मधून निघू लागला अचानक धूर
2 धूर निघाल्यामुळे उडाला एकच गोंधळ
रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था मध्य रेल्वेची झाली. अचानक आज आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ लोकल मधून अचानक धूर निघू लागला..
हि पहा सविस्तर बातमी –https://youtu.be/vFxi9khRdrY
घाबरलेल्या प्रवाशांनी मध्येच लोकल थांबवली आणि खाली उतरले या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला होता.. पाहूया नेमकं काय झालं.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ अचानक लोकल मधून धूर निघाला. मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. प्रवाशांनी लोकल मधून उड्या घेतल्या.
ब्रेक मध्ये घर्षण झाल्याने लोकलच्या चाकाला आग लागल्याचं समोर आलं. त्यामुळे स्थानकावर एकच गोंधळ उडाला.. ऐन सकाळी चाकरमान्यांची कार्यालयाकडे जाण्यासाठी गर्दी असते.
अशाच वेळी लोकलला आग लागल्यामुळे मोठा खोलंबा निर्माण झाला होता. रेल्वे प्रशासनानं वेळीच आग आटोक्यात आणली. त्यानंतर ही लोकल कार शेडकडे रवाना झाली.
एम.डी टी.व्ही न्यूज ब्युरो मुंबई