शिवसेनेच्या रणरागिणीनी दिली सामाजिक बांधिलकीची साक्ष ! ..

0
346

धुळे -१७/५/२३

आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि या राज्याला अनेक थोर महिला समाजसुधारकांची परंपरा लाभली आहे.
सावित्रीबाई फुले यांनी महिलांना सन्मानाचे जीवन देत त्यांना प्रगतीचा प्रवाह दाखविला पण याच महाराष्ट्रात आजही अनेक महिलांच्या वाटी उपेक्षेचे जगणे येत आहे. पण सावित्रीच्या लेकी देखील खंबीरपणे उभ्या आहेत.

शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख शुभांगी पाटील यांनी आपले राजकीय सामाजिक जीवन जगत असताना निडरपणे, ज्याही वेळी आपल्या भगिनींवर कुठलेही संकट आले तेव्हा पहिली धाव घेतली आहे.
त्यांनी नुकतेच एका किशोरवयीन तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त होताना वाचविले आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0

गोष्ट आहे, नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ या गावातील. अवघ्या १६ वर्ष वयाच्या मुलीचा बालविवाह करण्याचा घाट घालण्यात आला होता. ही गोष्ट शिवसेना महिला आघाडी च्या उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख शुभांगी पाटील यांच्या पर्यंत पोहोचली.
वेळ कमी होता आणि संकट मोठे! लग्नाच्या आदल्या रात्री च या विवाहाची माहिती शुभांगी पाटील यांना मिळाली.
या तरुणीचे आयुष्य वाचविणे ही पहिली प्राथमिकता आहे,
हा विचार करत शुभांगी पाटील लागलीच आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडीच्या स्थानिक पदाधिकारी महिलांना संपर्क केला.

सोबतच अहमदनगर जिल्ह्यातील सर्व सबंधित अधिकारी, एसपी यांना तसेच जिल्ह्यातील बालकल्याण समिती व बालन्याय मंडळाच्या बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांना या विषयाची तात्काळ माहिती देत विषयाची गंभीरता समजावून सांगितली.
शुभांगी पाटील यांनी दाखवलेल्या याच तत्परतेने बालकल्याण समितीचे अधिकारी, पोलिस प्रशासन व संबंधित गावचे सरपंच, ग्रामसेवक या सर्वांनी सहकार्य केले.
आपापल्या परीने सर्वांनी प्रयत्न केले आणि हा बालविवाह रोखण्यात आला.
आता या तरुणीचे भविष्यातील आयुष्य सुकर झाले आहे.शिवसेनेच्या 20%राजकारण व 80%समाजकारण या हिंदुहृदयसम्राट स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या धोरणानुसार या विषयी शुभांगी पाटील यांनी जे धाडस दाखवले त्याचे सर्व संबंधितांनी कौतुक केले आहे.

बालविवाहामुळे होणारे नुकसान, त्याविरुद्ध असणाऱ्या कायदेशीर तरतूदी यांची माहिती सेनेच्या सर्व महिला पदाधिकारी यांच्या सह पाटीलांनी सर्वांना दिली, त्यातून संबंधित लोकांचे प्रबोधन झाले असून शुभांगी पाटील यांनी उचललेले हे धाडसी पाऊल किती योग्य होते याची प्रचिती सर्वांना आली आहे.
शिवसेनेच्या सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण शुभांगी पाटील यांनी घालून दिले ..
खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचा वारसा पुढे नेत त्यांनी सामाजिक ऋण फेडलेत ..
चला आपणही बालविवाह रोखण्यात एक पाऊल पुढे टाकू या ..
दिलीप साळुंखे,धुळे तालुका प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here