अक्कलकुवा:१९/२/२३
ॲपल नावाच्या कंपनीला चक्क अक्कलकुवातील एका युवकानं अलर्ट केलं.. आणि त्याने मिळवलं अकरा लाखांचं बक्षीस..
लॅपटॉप मधील डाटा चोरीला जाऊ नये यासाठी सुचवलेल्या उपाययोजना ॲपल कंपनीने ग्राह्य धरून अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील एका तरुणाला अकरा लाख रुपयांचे बक्षीस दिले..
या तरुणाचं नाव आहे ओम कालिदास कोठावदे.. ॲपल कंपनीचा लॅपटॉप मध्ये डेटा चोरीला जाण्याची भीती ओमला जाणवली. त्यानुसार चार महिन्यांपासून ओम या कंपनीच्या संपर्कात येऊन याबाबत अधिक माहिती त्याने जाणून घेतली.
लॅपटॉप स्क्रीन बंद दरम्यान लॅपटॉप मधील डाटा चोरीला जाण्याची शक्यता असल्याचं त्याने पटवून दिलं.
डेमो स्क्रीन शॉट च्या माध्यमातून संबंधित कंपनीला केला. ही त्रुटी कंपनीच्या निदर्शनास आणून दिली. तात्काळ कसे करून बघितल्यास खरंच डाटा चोरीला जात असल्याची भीती त्यांना निर्माण झाली.
ओमने केलेल्या कार्याचे ॲपल न कौतुक केलं व आभार देखील मानले. कंपनीकडून त्याला 13500 डॉलर म्हणजे जवळपास 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं.
अक्कलकुवा तालुक्यातील पेचरीदेव येथील आश्रमशाळेचे मुख्याध्यापक कालिदास कोठावदे यांचा तो मुलगा आहे. त्याचं शिक्षण नंदुरबार येथे झालंय. पुढील शिक्षण सध्या तो पुणे येथे घेत आहे.
अशा युवकांकडून निश्चितचपणे तरुण पिढीने प्रेरणा घ्यावी.. आणि नंदुरबार जिल्ह्याची मान यशाच्या पटलावर उंचवावी.. ओमच्या पुढील वाटचालीस एम.डी. टी.व्ही न्यूजच्या शुभेच्छा..
तेजस पुराणिक जिल्हा प्रतिनिधी एम.डी .टी.व्ही न्यूज नाशिकसह ब्युरो रिपोर्ट एम.डी.टी.व्ही न्यूज पुणे…