साक्री: १७ /२/२३
शॉर्ट हेडलाईन
1 बंद अवस्थेतील केमिकल कारखाना सुरू झाल्याने नागरिक संतप्त
2 नागरिकांच्या निवेदनाकडे प्रशासनाने फिरवली पाठ
3.. या नागरिकांचा कोण आहे वाली? नागरिकांचा संतप्त सवाल
धुळे जिल्ह्यातील साक्री शहराजवळील अंबापुर परिसरातील देवनगर गावासमोर वलय नावाची केमिकल कंपनी आहे.. बंद अवस्थेतील कंपनी पुन्हा सुरू झाल्यानं गावासमोर अनेक प्रश्न उभे राहिलेत..
सदर कारखाना यापूर्वी बँकेने जप्त केला होता. जप्त केलेला बंदवस्थेतील कारखाना अलीकडेच पुन्हा सुरू झाल्यानं देवनगर भागातील नागरिक संतप्त झाले आहेत. कारखान्यातून बाहेर पडणारे विषारी रासायनिक द्रव्य जमिनीत सोडल्यामुळे परिसराच्या जमिनीत त्याचा प्रादुर्भाव झाला असून विषारी रसायन पसरायला सुरुवात झाली आहे. कारखान्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होतोय.
परिसरातील कांदे भाजीपाला इत्यादी बागायती शेतीतील पिके मरण पावली आहेत. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होतंय. या भागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी यापूर्वी 24 जानेवारी 2023 रोजी याबाबतचे निवेदन तहसीलदारांना सादर केलं होतं. मात्र प्रशासनाने या संदर्भात कुठलेही कायदेशीर कारवाई केलेली दिसत नाही.
उलट बंद अवस्थेतील कारखाना पुन्हा सुरू करून नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
या केमिकल कंपनीवर ताबडतोब कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा या परिसरातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी दिलाय..
जितेंद्र जगदाळे साक्री तालुका प्रतिनिधी एम.डी .टी.व्ही न्यूज धुळे…