नंदुरबार :- धुळे येथील साक्री रोड परिसरातील रहिवासी असलेल्या महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी शहादा तालुक्यातील तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे येथील साक्री रोड परिसरातील रहिवासी आशाबाई नागो मोरे (वय ४५) यांना त्यांची नात लक्षीका हिला भेटू न देता शहादा तालुक्यातील डोंगरगांव येथील जगन्नाथ कृष्णा शिंदे, पंकज जगन्नाथ शिंदे व मंजुषा रोशन मोरे यांनी शिविगाळ करुन मानसिक छळ केला.त्त्यांच्या या जाचाला कंटाळून आशाबाई मोरे यांनी आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराहे देखील वाचा:
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
याप्रकरणी भुषण नागो मोरे यांच्या फिर्यादीवरुन तिघा संशयितांविरोधात सारंगखेडा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी करत आहेत.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

