राज्यातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एस.टी. बसमध्ये महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत नुकतीच देण्यात आली. त्यामुळे एसटी प्रवाशात वाढ होऊन उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यातच आता एस.टी. बसचे सारथ्य महिला चालकांच्या हाती सोपविण्यात येत आहे. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल करीत आहेत. शहरात महिला ड्रायव्हींग करताना पाहून आपल्याला फारसे आश्चर्य वाटत नाही. परंतू आता एसटी सारख्या अवजड वाहनाची वाहतूक करताना ग्रामीण भागात महिला दिसणार आहेत. याची सुरुवात सिन्नर-नाशिक मार्गावर करण्यात आली आहे.
हे सुध्दा वाचा:
GOOD NEWS… लिटरमागे १० रुपयांनी स्वस्त झाले – MDTV NEWS
BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS
जावयाचा खून! तिघांना जन्मठेप.. – MDTV NEWS
ब्रेकिंग -उद्धव ठाकरेंना शिंदेंचा जबरदस्त झटका .. सेना भवनाला सुरुंग.. – MDTV NEWS
एसटी महामंडळात महिलांनी कंडक्टर ( वाहक ) म्हणून अनेक वर्षांपासून जबाबदारी सांभाळली आहे. आता एसटी सारख्या अवजड वाहनाचे सारथ्य प्रथमच महिला चालक करणार आहेत. राज्य परिवहनच्या सेवेत महिला चालक देखील रुजू झाल्या असून नुकत्याच माधवी संतोष साळवे ( बि. क्र.४१७४४ ) यांनी ‘सिन्नर– नाशिक’ मार्गावर एसटी बस चालवून नव्या पर्वाची सुरुवात केली आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
माधवी साळवे यांना बस चालवतांना पाहून सिन्नर तालुक्यातील प्रवाशांनी त्यांचे कौतुक करीत त्यांना प्रोत्साहन दिले आहे. एसटी महामंडळाचा नुकताच ७५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. १ जून १९४८ पुणे ते नगर मार्गावर पहीली एसटी बस धावली होती. सध्या १६ हजार बसेसद्वारे सुमारे ९० हजार कर्मचारी एस टी महामंडळात सेवा बजावत आहेत. एस टी मध्ये सरळ सेवा भरती सन २०१९अंतर्गत चालक तथा वाहक पदासाठी भरती झाली होती. आता महिला चालक कम वाहक पदाकरीता एकूण २०६ महिला उमेदवारांची भरती झाली होती.
हे सुध्दा वाचा:
GOOD NEWS… लिटरमागे १० रुपयांनी स्वस्त झाले – MDTV NEWS
BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS
जावयाचा खून! तिघांना जन्मठेप.. – MDTV NEWS
ब्रेकिंग -उद्धव ठाकरेंना शिंदेंचा जबरदस्त झटका .. सेना भवनाला सुरुंग.. – MDTV NEWS
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E
त्यात अनुक्रमे पुणे–३१, नागपूर आणि अमरावती-२१, बुलढाणा – १७, नाशिक – १५, जळगाव – १३ यवतमाळ, – १२, वर्धा आणि सांगली – ११, भंडारा – ९, औरंगाबाद आणि सातारा – ८, परभणी – ७ असे २०६ महिला उमेदवार पात्र ठरले. त्यानंतर खडतर प्रशिक्षण, वैद्यकीय तपासणी या फेऱ्यांतून छाननी होऊन अंतिम २८ महिला चालकांची नेमणूक झाली आहे. त्यात सर्वाधिक उमेदवार नाशिक – १२, औरंगाबाद आणि पुणे येथून प्रत्येकी ५ ,नगर येथून ३, परभणी येथून २ आणि जालना येथून एका उमेदवाराची निवड झाली आहे.
दिलीप साळुंखे. एमडी.टीव्ही. न्युज धुळे ग्रामीण