मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन..

नंदुरबार -१६/४/२३

शहरातील मंगळ बाजार व्यापारी असोसिएशन तर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी नंदुरबार जिल्हा महिला दक्षता समितीच्या सदस्या आणि डॉ. काणे गर्ल्स प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सुलभा महिरे यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पाअर्पण करण्यात आले.
मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र चौधरी यांनी प्रस्ताविक केले.तसेच विद्यमान अध्यक्ष संजय भदाणे यांनी मुख्याध्यापिका सुलभा महिरे यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले.
अभिवादन प्रसंगी सुलभा महिरे यांनी सांगितले की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांचे नव्हे तर साऱ्या जगाचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व होते.घटनेच्या शिल्पकारांनी संविधानातुन साऱ्या जगाला संघटित करण्याचे सामर्थ्य दाखविले.

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

SPONSORED CONTENT

https://bit.ly/3UoK7E0
अभिवादन कार्यक्रमास डॉ. चेतन संजय चौधरी, उद्योजक जगदीश शितपाल, विनोद अंबाणी,पत्रकार हंसराज चौधरी, प्रेमचंद राजपूत, महेंद्र चौधरी, अविनाश चौधरी, सागर चौधरी, दगा चौधरी, आदी उपस्थित होते.

प्रविण चव्हाण एम डी टी व्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here