बोरींगच्या पाईपवरुन वाद; आठ जणांविरोधात गुन्हा
नंदुरबार : तळोदा तालुक्यातील छोटा धनपूर येथे सामाईक बोरींगच्या वादातून दोन गटात मारहाण झाली. यात तीनजण जखमी झाले आहेत. परस्पर फिर्यादीतून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, तळोदा तालुक्यातील छोटा धनपूर येथे योगेश बाबुलाल पवार यांनी सामाईक बोरींगचे पाईप आमश्या हुण्या पवार यांना न विचारता काढून टाकले. याचा राग आल्याने योगेश पवार यांना ईश्वर आमश्या पवार याने विट डोक्यावर मारुन दुखापत केली. तसेच आमश्या हुण्या पवार, किशोर आमश्या पवार यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. योगेश पवार यांच्या पत्नीस लक्ष्मीबाई आमश्या पवार हिने मारहाण केली. याबाबत योगेश पवार यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.गौतम बोराळे करीत आहेत.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
हे देखील वाचा:
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराआता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
तर आमश्या हुन्या पवार यांनी परस्पर दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमश्या पवार यांनी सामाईक बोरींगचा पाईप का लावला. याचे वाईट वाटून आमश्या पवार यांना योगेश बाबुलाल पवार याने काठीने डोक्यात, छातीवर, पाठीवर मारुन दुखापत केली. तसेच बाबुलाल हुन्या पवार, राजेश बाबुलाल पवार व जिजाबाई बाबुलाल पवार यांनी शिवीगाळ केली. याबाबत आमच्या पवार यांच्या फिर्यादीरुन तळोदा पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.विजय वसावे करीत आहेत.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार

