नंदुरबार कारागृह परिसरात होमगार्डकडेच सापडला गांजा

0
418
80752665 1

नंदुरबार- येथील कारागृह परिसरात एका होमगार्डकडेच सुका गांजा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या होमगार्डविरूध्द नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हा सुकागांजा कारागृह परिसरात कशासाठी नेला? कोणाला देण्यात येणार होता का ? आदी प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

याबाबत नंदुरबार तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होमगार्ड अनिल वळवी हा कर्तव्यावर असतांना कारागृह येथील स्वयंपाक गृहात संशयास्पदरित्या फेर्‍या मारतांना आढळून आला.

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

यामुळे तेथे उपस्थित अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्याची चौकशी केली असता 260 रूपये किंमतीचा 26 ग्रॅम वजनाच्या 4 प्लास्टीक पिशवीत हिरव्या रंगाचा सुका पाला सदृश्य गांजा व 5 हजार 160 रूपये रोख असा मुद्देमाल आढळून आला.

SPONSORED CONTENT
ganja 1 390x220 2

कारागृहातील कैद्यांना गांजा पुरविण्याच्या उद्देशाने मिळून आल्याप्रकरणी जिल्हा कारागृहातील सुभेदार जनार्दन गोपाल बोरसे यांच्या फिर्यादीवरून होमगार्ड अनिल वळवी याच्याविरूध्द एन.डी.पी.अ‍ॅक्ट 1985 चे कलम 20,22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here