Nandurbar News… शोरूममधील अपघातात कर्मचाऱ्याचा मृत्यू

0
494

नंदूरबार :- शहरातील धुळे रस्त्यावरील टाटा मोटर्स कंपनीच्या शोरूममध्ये ग्राहकाला चारचाकी वाहत दाखवत असताना अनावधानाने सेल्स एक्झिक्युटिव्हच्या माध्यमातून अपघात झाला. या अपघातात शोरूम मधील एका कर्मचाऱ्याचा गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना २१ जून रोजी दुपारी ४. ३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

ADVERTISEMENT

हे सुध्दा वाचा

नंदुरबारात रंगणार “खासदार चषक” क्रीडा महोत्सव…. खा.हिना गावितांच्या वाढदिवसानिमित्त अर्हत प्रतिष्ठानतर्फे क्रीडा सप्ताह ! | MDTV NEWS

SPONSORED CONTENT

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEW

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील टाटा शोरूममध्ये सेल्स एक्झिक्यूटिव्ह दीपक इंद्रसिंग राजपूत हे आलेल्या ग्राहकांना कारची माहिती देत असताना अनावधानाने कार सुरू झाली. एक्सीलेटर जोरात पाय दिला गेल्याने कार समोरच्या कारवर जाऊन आदळली. या अपघातात कारची साफसफाई करणारा कर्मचारी जितेंद्र वसंत शिरसाठ (वय ४२ वर्ष ) हे दोन्ही कारच्या मध्ये दाबले गेले. यात ते गंभीर जखमी झाले, त्यांना त्याच अवस्थेत शोरूम मधील कर्मचाऱ्यांनी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे सुध्दा वाचा

नंदुरबारात रंगणार “खासदार चषक” क्रीडा महोत्सव…. खा.हिना गावितांच्या वाढदिवसानिमित्त अर्हत प्रतिष्ठानतर्फे क्रीडा सप्ताह ! | MDTV NEWS

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEW

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जितेंद्र शिरसाठ यांना मृत घोषित केले. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात सुभाष भगवान बच्छाव रा. गुरुदत्त हाउसिंग सोसायटी, शहादा यांच्या फिर्यादीवरून टाटा शोरूम मधील सेल्स एक्झिक्यूटिव्ह दीपक इंद्रसिंग राजपूत रा. लक्ष्मी नगर नंदुरबार यांच्याविरुद्ध भादवि कलम ३०४ अ २७९,३३७, ३३८ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे प्राणांकित अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास पोलीस हवालदार जगदीश पवार करीत आहेत.
एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here