तर .. आम्ही नाट्यमंदिरात कार्यालय सुरु करू : माजी आ.शिरीष चौधरी

0
1819

माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या अधिपत्याखालील पालिकेत कोट्यवधींचा रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप

नंदुरबार :- पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी पुलकित सिंग यांनी १२ मे पासून छत्रपती नाटय मंदिराचे बुकींग यापुढे पालिकेच्या बांधकाम विभागाकडे करण्याचे आदेश दिले आहेत, असे असतांना श्री.रघुवंशी हे नाटय मंदिरातील कार्यालयात बसून पत्रकार परिषदा घेतात. ते बंद करण्यात यावे, अन्यथा आम्हीदेखील नाटय मंदिरात आमच्या बैठका सुरु करुन कार्यालय सुरु करू. पालिकेच्या मालकीच्या वास्तू ज्या संस्थांना दिल्या आहेत त्यांच्याकडूनच लाईट बिल, दुरुस्ती व देखभालीचा खर्च वसूल करणे आवश्यक आहे. मात्र माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या अधिपत्याखालील पालिकेने गेल्या १६ वर्षात कोट्यवधींचा रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप माजी आ.शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला.

ADVERTISEMENT

छत्रपती शिवाजी महाराज नाटय मंदिराशेजारील डोम पालिकेने ताब्यात घेतल्यानंतर गेल्या तीन चार दिवसांपासून समाज माध्यमातून विविध चर्चा सुरु आहेत. त्या पार्श्‍वभुमीवर काल दि.१४ रोजी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी डोमबाबत आपली भुमिका पत्रकारांसमोर मांडली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आज माजी आ.शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पालिकेचे माजी गटनेते चारुदत्त कळवणकर, माजी नगरसेवक आनंद माळी, प्रशांत चौधरी, निलेश पाडवी, लक्ष्मण माळी, लियाकत बागवान आदी उपस्थित होते.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

SPONSORED CONTENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

यावेळी शिरीष चौधरी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज नाटय मंदिर, इंदिरा मंगल कार्यालय, सी.बी.गार्डन, संजय टाऊन हॉल अशा वास्तूंना मालमत्ता कर लागणार नाही, असा संभ्रम निर्माण केला जात असल्याचा निष्कर्ष पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी पुलकित सिंग यांनी काढला असून या वास्तू ज्या संस्थांना दिल्या आहेत त्यांच्याकडूनच लाईट बिल व इतर दुरुस्ती व देखभालीचा खर्च वसूल करणे आवश्यक आहे.

पालिकेने तसे केले नसून माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या अधिपत्याखालील पालिकेने गेल्या १६ वर्षात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. श्री.रघुवंशी हे जनतेची दिशाभूल करतात. मग पालिकेच्या व्यापारी संकुलांना मालमत्ता कर का आकारला जातो? जनतेसाठी त्यांनी डोम उभारला तर त्यांच्याकडून पैसे का घेतात? असा प्रश्‍न उपस्थित श्री.चौधरी यांनी उपस्थित केला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

ते पुढे म्हणाले की, नाटय मंदिराचे भाडे आकारतांना लाईट बिल वेगळे आकारले जाते. सदर लाईट बिल संबंधीतांकडून वसूल केले जाते, तरीही सदर लाईट बिल नगरपालिकेतर्फे भरले जाते, नाटय मंदिराची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधीत संस्थेवर असतांना मध्यंतरीच्या काळात केलेल्या देखभाल दुरुस्तीचा खर्च पालिकेने केला आहे. याशिवाय नाटय मंदिरात कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांचा पगारही संबंधीत संस्थेने देणे बंधनकारक असतांना हा पगारही पालिकाच देते, मग संस्था केवळ पैसे गोळा करण्याचेच काम करते का? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी पुलकित सिंग यांनी १२ मे पासून छत्रपती नाटय मंदिराचे बुकींग यापुढे पालिकेच्या बांधकाम विभागाकडे करण्याचे आदेश दिले आहेत, असे असतांना श्री.रघुवंशी हे नाटय मंदिरातील कार्यालयात बसून पत्रकार परिषदा घेतात व इतर बैठकाही तेथे घेतात, ते बंद करण्यात यावे, अन्यथा आम्हीदेखील जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन नाटय मंदिरात आमच्या बैठका व कार्यालय सुरु करू इशारा माजी आमदार शिरीष चौधरी यांनी शेवटी दिला.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here