“ब्रेकअप”चा राग ; युवतीसह भावाला मारहाण

0
525

नंदुरबार : प्रेमाचा ब्रेकअप झाल्याने युवतीने बोलणे बंद केल्याचा रागातून सदर युवतीला दुचाकीवरून खाली ओढून तिला व तिच्या भावाला मारहाण करीत अपहरण व जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील वासदरा येथील युवती व नांदरखेडा येथील युवकाचे प्रेमसंबंधात ब्रेकअप झाले. यानंतर युवतीने सदर युवकाशी बोलणे बंद केले होते. याचा राग तरुणाच्या मनात होता. दि.१२ मे रोजी सदर युवती तिच्या भावासोबत नंदुरबार शहरातील दुधाळे शिवारातील हस्ती नगर परिसरातून दुचाकीने जात होती. यावेळी युवकाने त्याच्या मित्रासह युवतीच्या भावाची दुचाकी अडवून युवतीला दुचाकीवरुन खाली ओढले व बळजबरीने त्याच्या दुचाकीवर बसवून घेवून जाण्याचा प्रयत्न केला.

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

SPONSORED CONTENT

यास युवतीच्या भावाने विरोध केला असता युवकाने युवती व तिच्या भावाला मारहाण केली. तसेच उचलून घेऊन जाऊन युवतीच्या परीवाराला मारण्याची धमकी दिली. या ठिकाणी जमाव जमल्याने घटनास्थळावरुन युवकासह त्याच्या मित्राने पळ काढला. युवतीच्या फिर्यादीवरुन नांदरखेडा येथील संशयित युवक व त्याच्या मित्राविरोधात नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना.संपत वसावे करीत आहेत.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here