नाशिक :१७/२/२३
नुकताच केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या बाजूने कौल दिला.. सेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदेंना मिळालं.. राज्यभरातून विविध पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली..
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना निवडणूक निकालाच्या विषयी पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले की निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा लोकशाहीला घातक आहे.. ऐकूया नेमकं बाळासाहेब थोरात यांनी काय प्रतिक्रिया दिली..
ठाकरे आणि शिवसेना हे समीकरण असून हे एकमेकांपासून त्यांना वेगळं काढू शकत नाही असं देखील थोरात यांनी म्हटलंय.
तर सर्वसामान्य जनता उद्धव ठाकरेंच्याच पाठीशी उभे राहील असं ते सांगायला विसरले नाहीत.
निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असल्याने त्यांनी एकतर्फी निर्णय कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने देऊ नयेत. महाराष्ट्रातील जनता हे जाणून आहे.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी सर्वसामान्य जनता उभी आहे.
नाशिकहून तेजस पुराणिक जिल्हा प्रतिनिधी एम.डी. टी.व्ही न्यूजसह एम.डी .टी.व्ही न्यूज ब्युरो संगमनेर