तोरणमाळला एकावर कुऱ्हाडीने वार

0
347

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील तोरणमाळचा विंददेवपाडा येथे भांडणाच्या कुरापतीतून एकावर कुऱ्हाडीने वार केल्याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील तोरणमाळचा विंददेवपाडा येथील सुदाम दिला चौधरी हे एका कार्यक्रमात ढोल वाजवित असतांना भांडणाची कुरापत काढून काहऱ्या मोमदा नाईक याने कुऱ्हाड व जहागऱ्या मोमदा नाईक याने तार गुंडाळलेला बांबू सुदाम चौधरी यांच्या डोक्यात मारुन दुखापत केली.

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

SPONSORED CONTENT

तसेच मनोज मोमदा नाईक, मोमदा तिडक्या नाईक, शिवराम काहऱ्या नाईक, सुभा काहऱ्या नाईक, मुक्शा जहागीर नाईक यांनी काठ्या व बांबूने मारहाण केली. याबाबत सुदाम चौधरी यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२६, ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर बडगुजर करीत आहेत.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here