आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून वीर एकलव्य जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी…

0
413

शिंदखेडा :१८/२/२३

शॉर्ट हेडलाईन
1 जिल्हा सचिव गुलाब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं आयोजन
2 दलवाडे गावातून काढण्यात आली मिरवणूक
3 विरदेल गावात साजरी झाली एकलव्य जयंती

शिंदखेडा तालुक्यातील आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून विर एकलव्य जयंती विविध गावात साजरी करण्यात आली.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्य कार्यालयात जिल्हा सचिव गुलाब सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला.

पोलीस उपनिरीक्षक प्रशांत गोरावडे यांनी प्रतिमा पूजन केलं.

तर दलवाडे येथे थाटामाटात वेशभूषेत मिरवणूक करण्यात आली.

विरदेल गावात पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं..

या विविध कार्यक्रमांना जिल्हा सचिव गुलाब सोनवणे यांच्यासह नाना कुवर ,भूपेंद्र देवरे श्याम सोनवणे, तालुका सचिव आनंद मोरे, अनिल ठाकरे, दिलीप ठाकरे ,आबा ठाकरे, समाधान मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यादवराव सावंत, शिंदखेडा तालुका प्रतिनिधी, एम.डी. टी.व्ही न्यूज शिंदखेडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here