शिरपूर : कुजलेल्या अवस्थेत आढळून आला तरुणाचा मृतदेह..

0
508

शिरपूर : २६/२/२३

शिरपूर तालुक्यात तरडी परिसरातील एका शेतात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली.

हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटू शकली नाही.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिर्यादी हिसाळ येथील शेतकरी मोतीलाल बाबुराव परदेशी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

24 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास गोविंद परदेशी यांच्या मका लावलेल्या शेतात अज्ञात व्यक्तीने दोन्ही हात पाठीमागे बांधून अनोळखी इसमाचा खून केलाय.

जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या हेतून गोविंद परदेशी यांच्या शेतात आणून फेकल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस उपनिरीक्षक उमेश बोरसे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 302 201 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केलाय.

पुढील तपास थाळनेर पोलीस करीत आहे.
राज जाधव शिरपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी एम.डी टी.व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here